नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये आवश्यक असणाऱ्या अँप विषयी माहिती पाहणार आहोत. त्या अँप च नाव आहे.ई-पीक पाहणी | E Pik Pahani हे अँप शेतकऱ्या साठी खूप महत्वाचे आहे. कारण या अँप च्या माध्यमातून आपण आपल्या ७ /१ २ वर आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईल च्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या करू शकतो.
आता महत्वाचा विषय म्हणजे हे अँप आणि हि नोंद आवश्यक आहे का ? तर हो कारण जर आपल्या ७ /१ २ वर आपल्या पिकाची नोंद नसेल तर आपण तर आपणाला शासकीय अनुदान विमा भेटण्यासाठी आपणाला अडचणी येऊ शकतात. त्याच बरोबर आपनाला जर आपला शेतमाल हमीभावने विकायचा असेल तर आपल्या सातबाऱ्यावर आपल्या शेतातील पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
म्हणूनच आपण आज शेतकऱ्या साठी आवश्यक असणाऱ्या ई पीक पाहणी अँप विषयी या ब्लॉग च्या माध्यमातून माहिती घेणार आहोत.
ई-पीक पाहणी | E Pik Pahani app विषयी सविस्तर माहिती
हे ॲप भारतीय कृषी आणि ग्राहक सहकार्य मंत्रालयाचे अधिकृत ॲप आहे. जे शेतकऱ्यांसाठी डिझाइन केलेले आहे. ॲपचे उद्दिष्ट तुमच्या शेतीच्या क्रियाकलापांचे दैनंदिन व्यवस्थापन सुलभ करणे आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकांशी संबंधित प्रत्येक पैलूवर सोप्या आणि कार्यक्षमतेने देखरेख आणि नियंत्रण करता येईल. ई-पीक पाहणी ई-पीक पाहणी द्वारे तुम्ही तुमच्या प्लॉट, पिके आणि झाडे किंवा झाडांच्या स्थितीच्या तपशीलवार नोंदी ठेवू शकता, ज्यामुळे तुम्हाला उत्पादन ऑप्टिमाइझ करण्यात मदत होईल आणि तुमच्या शेतात निर्णय घेण्यात सुधारणा होईल.
कृषी हा भारतातील आर्थिक विकासाचा आधारस्तंभ आहे, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक प्रगत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ई-पीक पहाणी अॅप हे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले असे एक डिजिटल साधन आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची माहिती आणि आढावा घेणे सोपे झाले आहे. हे अॅप शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण साधन बनले आहे, ज्यामुळे शेती व्यवस्थापन आणि पीक नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात मदत मिळाली आहे.
आपल्या पिकांवर आणि वनस्पतींवर अचूक नियंत्रण ठेवा
ई-पीक पाहणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या पिकांचे सर्वसमावेशक निरीक्षण ठेवण्याची क्षमता प्रदान करते. हे ॲप तुम्हाला प्रत्येक पिकासाठी वापरलेले बियाणे आणि पेरणीची तारीख प्रविष्ट करू देते, ज्यामुळे पीक चक्राच्या सुरुवातीपासून प्रगतीचा अचूक मागोवा घेणे सोपे होते. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या कापणीची तारीख आणि प्रमाण नोंदवू शकता, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक पिकाच्या उत्पन्नाचे मूल्यांकन करता येईल आणि परिणामांनुसार तुमची लागवड आणि कापणीची रणनीती समायोजित करू शकता.
भविष्यातील कापणीचा अंदाज लावा
ई-पीक पाहणीमध्ये वनस्पतीचा प्रकार, त्याचे वय आणि त्याची उंची नोंदवण्यासाठी विशिष्ट कार्ये देखील समाविष्ट आहेत. ही माहिती तुमच्या झाडांची वाढ आणि आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे जेणेकरून त्यांना वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती काळजी मिळेल. या डेटाच्या तपशीलवार नोंदी ठेवून, तुम्ही तुमची झाडे व्यवस्थापित करण्याबाबत चांगले निर्णय घेऊ शकता आणि उत्पादनावर परिणाम करणाऱ्या संभाव्य समस्यांचा अंदाज घेऊ शकता.
शाश्वतता आणि पीक संरक्षण
ई-पीक पाहणी केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांसाठीच उपयुक्त नाही, तर भारतीय शेतीच्या सर्वांगीण कल्याणातही ते योगदान देते. पीक आणि वनस्पती परिस्थितींबद्दल अचूक आणि अद्ययावत डेटा प्रदान करून, आपण प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर कृषी विकासाचे निरीक्षण करण्यासाठी सरकारला मदत करत आहात. संभाव्य कीटक, सिंचन समस्या किंवा कृषी उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय परिस्थितीतील बदल शोधण्यासाठी हे आवश्यक आहे. परिणामी, देशातील शाश्वतता आणि अन्नसुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी ई-पीक पाहणीने स्वतःला एक महत्त्वाचे साधन म्हणून स्थापित केले आहे.
ई-पीक पाहणी बद्दल माहिती 3.0.3
पॅकेजचे नाव | io.sc.eppCordova | |
परवाना | मोफत | |
ऑपरेटिंग सिस्टम | Android | |
श्रेणी | खाजगी | |
भाषा | हिंदीआणखी 15 | |
प्रवर्तक | महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. | |
डाउनलोड करा | ३६,०४९ | |
तारीख | 1 अग. 2024 | |
सामग्री रेटिंग | +3 | |
जाहिरात | निर्दिष्ट नाही | |
हे ॲप Uptodown वर का प्रकाशित केले आहे? | (अधिक माहिती) |
अँप डाउनलोड करण्यासाठी लिंक ~ ई-पीक पाहणी

ई-पीक पाहणी कशी करायची? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
शेतकरी वर्गात सध्या ई-पीक पाहणीविषयी बरीच चर्चा सुरू आहे. ई-पीक पाहणी हा उपक्रम महाराष्ट्र सरकार गेल्या ४ वर्षांपासून राबवत आहे. या उपक्रमाद्वारे शेतकरी स्वत: त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे.यंदाच्या खरिप हंगामात २ ० सप्टेंबर 1 कोटी 11 लाख 80 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास 50 लाखांहून अधिक हेक्टरवरील पीक पाहणी बाकी आहे.२ ४ मध्ये पिकांची नोंद करण्यासाठी २ ३ सप्टेंबर २ ० २ ४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तलाठी स्तरावरील पीक पाहणी केली जाणार आहे.म्हणजे ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करणं राहून जाईल, त्यांची पीक पाहणी तलाठ्यांना करावी लागणार आहे.
ई-पीक पाहणी कशी करायची ?
ई-पीक पाहणी अँप वापरून पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ई-पीक पाहणी हे अँप डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani असं सर्च करायचं आहे. त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे. इस्टॉलेशन कम्प्लिट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. याला डावीकडे सरकवल्यास हे अँप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.

त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे.
- पुढे नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- इथं सुरुवातीला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून पुढे जायचं आहे. मग पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता.
- इथं गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचं आहे.
- मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा नावाचं पेज ओपन होईल.

- आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण, तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्ही गेल्या वर्षी या अॅपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथं येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथं येणार नाही.
पीक माहिती भरा

- इथल्या हो या पर्यायावर क्लिक करा.
- आता खातेदाराचं नाव निवडा. सांकेतांक विसरलात यावर क्लिक करा आणि मग सांकेतांक क्रमांक टाका. समजा ब्लँक स्क्रीन आली, तर मग होम या पर्यायावर क्लिक करा.
- आता पीक पाहणीच्या अँपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप येईल.
- पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.
- एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.
- पुढे अक्षांश रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग शेवटी फोटो काढावर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.
- फोटो काढून झाला की बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली, ती तुमच्यासमोर दाखवली जाईल. त्याखालच्या स्वयंघोषणेवर तुम्हाला टिक करून पुढे जायचं आहे.
- पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे म्हणायचं आहे.
- नोंदवलेल्या पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.
- अशाचप्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेली प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल.
- सगळ्यांत शेवटी अपलोड या पर्यायावर क्लिक करून माहिती अपलोड करायची आहे.
- अशाचप्रकारे या अॅपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. तसंच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहितीही पाहू शकता.
हेही वाचा :~ भारतातील बेस्ट UPI पेमेंट अँप 2024
हेही वाचा :~ Google Translate ने कोंणत्याही भाषेचे रूपांतर करा आपल्या भाषेत.
कायम पड व चालू पड नोंदवा
या पर्यायांच्या माध्यमातून आपण आपल्या पडीक क्षेत्राची नोंद करू शकतो.
बांधावरची झाडे नोंदवा
शेतकरी आपल्या शेतीतील बांधावर झाडे लावत असतो. भविष्यात आपणाला अडी अडचणी येऊ नये. म्हणून आपण त्या झाडाची नोंद आपल्या सातबारावर करून तलाठ्याच्या माध्यमातून आपण या आधी करत होत. परंतु आता आपणाला तलाठ्या कडे जाण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईल मधील ई-पीक पाहणी या अँप च्या माध्यमातून सातबारा वर याची नोंद करू शकतो.
गावाचे खातेदाराची पीक पाहणी
या पर्यायांच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व गावातील खातेदाराची यादी पाहू शकतो. त्यात आपले नाव जर निळ्या रंगाच्या पट्टीत असेल तर आपली नोंदणी योग्य प्रकारे झाली आहे असे समजावे. आणि जर आपले नाव जर पांढऱ्या रंगात असेल समजा आपली नोंदणी झाली नाही.
ई पीक पाहणीचे फायदे काय?
- ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जात असल्याचं ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
- MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो.
- पीक कर्जाच्या पडताळणीसाठी – तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का, याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. 100 च्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत.
- पीक विमा योजनेच्या लाभासाठी – विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक, यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं.
- नुकसान भरपाईसाठी – नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.
ई-पीक पहाणी अॅपचे उद्दिष्ट
या अॅपच्या निर्मितीमागील उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
- शेतकऱ्यांना तांत्रिक पातळीवर मदत करणे.
- पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया उपलब्ध करणे.
- सरकारला पीक नोंदणीची अचूक माहिती मिळवून शेतीसाठी योग्य धोरणे तयार करण्यासाठी मदत करणे.
- शेतीसाठी आवश्यक कर्ज, विमा योजना, आणि अनुदान यासारख्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे.
ई-पीक पहाणी अॅप कसे कार्य करते?
१. नोंदणी प्रक्रिया:
शेतकऱ्यांना ई-पीक पहाणी अॅप वापरण्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागते. शेतकऱ्याला त्यांच्या मोबाईल नंबरद्वारे अॅपवर नोंदणी करता येते.
२. पीक नोंदणी:
अॅपमध्ये शेतकरी त्यांच्या जमिनीची माहिती, क्षेत्रफळ, आणि त्या ठिकाणी कोणते पीक घेतले आहे याची नोंद करू शकतात. शेतकऱ्यांना जमिनीचे सर्वेक्षण नंबर आणि पिकाचे फोटो अपलोड करण्याची सुविधा मिळते.
३. सॅटेलाईटच्या माध्यमातून डेटा गोळा करणे:
हे अॅप सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांची स्थिती तपासून शेतकऱ्यांना योग्य सल्ला देते. यामुळे प्रत्यक्ष शेती निरीक्षण करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचतात.
४. पीक नुकसानाची नोंद:
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची नोंद करण्याची सुविधा मिळते. या नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवणे सोपे होते.
५. विमा योजना आणि कर्जाची माहिती:
अॅपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या विमा योजना, कर्जाची उपलब्धता, आणि अन्य सरकारी योजनांची माहिती मिळते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक सहाय्य मिळवणे सोपे होते.
ई-पीक पहाणी अॅपचे फायदे
१. पारदर्शकता आणि अचूकता:
अॅपमधून पिकांची नोंदणी थेट शेतकऱ्यांकडून केली जाते, ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होते.
२. शेतीच्या तांत्रिक बाबींची माहिती:
अॅपद्वारे शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पद्धती, आणि शेतीसाठी आवश्यक ज्ञान मिळते. यामुळे शेतीत उत्पादन वाढवण्यास मदत होते.
३. सरकारला धोरणे आखण्यात मदत:
अॅपमधून मिळालेल्या आकडेवारीचा वापर करून सरकार शेतीसाठी आवश्यक धोरणे तयार करू शकते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी सहाय्य मिळते.
४. पीक नुकसानाची जलद नोंदणी:
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची नोंद अॅपद्वारे जलद गतीने करता येते, ज्यामुळे नुकसान भरपाई मिळवणे सुलभ होते.
ई-पीक पहाणी अॅप म्हणजे काय?
ई-पीक पहाणी अॅप हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेले एक मोबाईल अॅप्लिकेशन आहे, ज्याद्वारे शेतकरी त्यांची पीक नोंदणी, क्षेत्रफळ आणि पिकांचे उत्पादन याबाबत माहिती देऊ शकतात. हे अॅप ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती गोळा करते, ज्यामुळे सरकारला शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि योजनांचा लाभ देणे शक्य होते.
ई-पीक पहाणी अॅपचे उद्दिष्ट
या अॅपच्या निर्मितीमागील उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
- शेतकऱ्यांना तांत्रिक पातळीवर मदत करणे.
- पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया उपलब्ध करणे.
- सरकारला पीक नोंदणीची अचूक माहिती मिळवून शेतीसाठी योग्य धोरणे तयार करण्यासाठी मदत करणे.
- शेतीसाठी आवश्यक कर्ज, विमा योजना, आणि अनुदान यासारख्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे.
ई-पीक पहाणी अॅप कसे कार्य करते?
१. नोंदणी प्रक्रिया:
शेतकऱ्यांना ई-पीक पहाणी अॅप वापरण्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागते. शेतकऱ्याला त्यांच्या मोबाईल नंबरद्वारे अॅपवर नोंदणी करता येते.
२. पीक नोंदणी:
अॅपमध्ये शेतकरी त्यांच्या जमिनीची माहिती, क्षेत्रफळ, आणि त्या ठिकाणी कोणते पीक घेतले आहे याची नोंद करू शकतात. शेतकऱ्यांना जमिनीचे सर्वेक्षण नंबर आणि पिकाचे फोटो अपलोड करण्याची सुविधा मिळते.
३. सॅटेलाईटच्या माध्यमातून डेटा गोळा करणे:
हे अॅप सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांची स्थिती तपासून शेतकऱ्यांना योग्य सल्ला देते. यामुळे प्रत्यक्ष शेती निरीक्षण करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचतात.
४. पीक नुकसानाची नोंद:
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची नोंद करण्याची सुविधा मिळते. या नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवणे सोपे होते.
५. विमा योजना आणि कर्जाची माहिती:
अॅपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या विमा योजना, कर्जाची उपलब्धता, आणि अन्य सरकारी योजनांची माहिती मिळते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक सहाय्य मिळवणे सोपे होते.
ई-पीक पहाणी अॅपचे फायदे
१. पारदर्शकता आणि अचूकता:
अॅपमधून पिकांची नोंदणी थेट शेतकऱ्यांकडून केली जाते, ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होते.
२. शेतीच्या तांत्रिक बाबींची माहिती:
अॅपद्वारे शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पद्धती, आणि शेतीसाठी आवश्यक ज्ञान मिळते. यामुळे शेतीत उत्पादन वाढवण्यास मदत होते.
३. सरकारला धोरणे आखण्यात मदत:
अॅपमधून मिळालेल्या आकडेवारीचा वापर करून सरकार शेतीसाठी आवश्यक धोरणे तयार करू शकते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी सहाय्य मिळते.
४. पीक नुकसानाची जलद नोंदणी:
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची नोंद अॅपद्वारे जलद गतीने करता येते, ज्यामुळे नुकसान भरपाई मिळवणे सुलभ होते.
ई-पीक पहाणी अॅप कसे डाउनलोड करावे?
शेतकरी ई-पीक पहाणी अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. अॅप डाउनलोड केल्यानंतर शेतकरी त्यांचे मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड वापरून अॅपमध्ये लॉगिन करू शकतात. त्यानंतर ते त्यांची पिकांची माहिती सहजगत्या नोंदवू शकतात.
ई-पीक पहाणी अॅपचे भविष्यातील महत्त्व
ई-पीक पहाणी अॅपमुळे शेतीसंबंधित माहितीची गोळा करण्याची प्रक्रिया अधिक डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित झाली आहे. भविष्यात या अॅपद्वारे शेतकऱ्यांना अधिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता आहे.
निष्कर्ष:
ई-पीक पहाणी अॅप हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी करण्याची, पिकांची स्थिती जाणून घेण्याची, आणि शेतीसाठी योग्य सल्ला मिळवण्याची सुविधा मिळाली आहे.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.
Thanks to everyone who shared their experiences. It’s been really helpful