Ek Deep Shaheed Ke Naam : मेंढा येथे एक दीप शहीदो के नाम कार्यक्रम उत्साहात संपन्न

एक पल रुको जरा,
जरा कुर्बानी याद करो,
वतन के वीरो के,
जरा बलिदान याद करो।

Ek Deep Shaheed Ke Naam

Ek Deep Shaheed Ke Naam मेंढा येथे एक दीप शहीदो के नाम कार्यक्रम जर वर्षी प्रमाणे या हि वर्षी आयोजित केला होता. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलेल्या वर्ष पासून मेंढा येथे दिवाळीतील पाडव्या दिवशी दि. ० २ /१ १२ ० २ ४ वार शनिवार या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात गावातील शेकडो तरुण महिला उत्साहाने यात सहभाग घेतात.

हेही वाचा ~ श्री संत अण्णा महाराज मेंढा ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा-2024

कार्यक्रमाची रूप रेषा

मेंढा गावातील तरुण एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आयोजन करतात.या कार्यक्रमाचा ज्यांना जशी जमेल तशी वर्गणी तरुण गोळा करतात . हा कार्यक्रम गावातील शहीद उमेश पांडुरंग जावळे यांच्या समरणार्थ आयोजित केला जातो.हा कार्यक्रम लागतील सर्वात मुख्य भाग असलेल्या श्री संत अण्णा महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर आयोजित केला जातो. जेणे करून या कार्यक्रमात महिलांना सहभाग घेणे सोईचे होते.

सर्व प्रथम मंदिरा समोर भारत मातेचा एक मोठा नक्षा काढला जातो. त्यांतर त्यात भारतीयांची शान असलेला तिरंगा तयार करतात. त्या नक्षच्या चहू बाजून व मंदिराचा सर्व परिसर हजारो दीप ( तेलाचे )लावून सजवला जातो. त्यानंतर गावाच्या सुरवातीच्या टोका पासून संपूर्ण गावात शेकडो तरुण शहीद उमेश जावळे याचे मोठे पोस्टर एका वाहनावर लावतात व त्यावर दिव्याची रोषणाई करून कॅण्डल लावून अमर रहे अमर रहे उमेश जावळे अमर रहे अश्या घोषणा देतात. व संपूर्ण गावातून कॅण्डल मार्च काढतात.

शहीद उमेश पांडुरंग जावळे

या कार्यक्रमाचं आयोजन शहीद उमेश जावळे यांच्या समरणार्थ मेंढा येथे केले जाते. शहीद उमेश जावळे हे मेंढा ता. जि. धाराशिव येथील रहिवाशी आहे. उमेश हा गडचिरोली एटापल्ली ता. धानोरी येथे पोलीस दलात कमांडो पथक C .६ ० ( क्रॅक कमांडो ) बक्कल नंबर पो.शि./२ ० २ ७ कार्यरत असताना. रात्री 2.30 AM गस्त घालत असताना अचानक पणे नक्षलवाद्यांनी गोळीबार चालू केला. बेसावध पोलिसाना सावरण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. परंतु त्यातून हि पोलिसांनी नक्षलवाध्याना जोरदार गोळीबार केला व त्यांना हुसकावून लावले. परंतु त्यात असणारा मेंढा गावचा सुपुत्र उमेश जावळे हा प्रतिउत्तर देत असताना उमेश यांना गोळी लागली व ते शत्रूशी लढता लढता शहीद झाले.

हेही वाचा ~Manoj Jarange : जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार म्हणाले; उमेदवार नाही, कोणालाही पाडा..!

प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमात प्रमुख उपस्तीती म्हणून शहीद उमेश जावळे यांच्या आई-वडिलांना आमंत्रित करण्यात आले. तसेच मेंढा गावचे सरपंच श्री नामदेव माळी, तेसच स्वतंत्र्य सैनिक श्रीपती जावळे, मेंढा गावाचे पोलीस पाटील योगेश माळी, दिनकर चौरे, अविनाश जावळे, चंद्रकांत शेटे सर, गावातील सर्व, युवा वर्ग, महिला व देश प्रेमी उपस्थित होते.

श्रद्धांजली


एक पल रुको जरा,
जरा कुर्बानी याद करो,
वतन के वीरो के,
जरा बलिदान याद करो।
आज ही का वो दिन था,
वीरता से बढ़ता दल था,
कुछ कायरों की कायरता ने,
मिटाया वो दल बल था,
नैनो में तब भी नीर था,
आज भी अश्रुपूरित नयन हैं,
पल वो अन्तःकरण की पीर था,
गमनीन तब भी मन था,
गमनीन आज भी मन है,
क्यो आज वो दुःख नही,
क्यो वो जागती पीर नही,
कुछ तो आज जरा रुके,
सलाम जरा वीरो को दे,


जला कर मन के दिये,
देशभक्ति की राह चले,
ले संकल्प कुछ यूं हम आज,
कि उठने न देंगें एक शत्रु भी,
मिटा कर हर शत्रुता का भाव,
जला कर कुछ प्रेम ज्योति हम,
कुछ श्रद्धासुमन अर्पित करे,
वह जो रक्षक सरहद के तो,
हम सब भी वसुधा के रक्षक है,
कर्तव्य हम सब के भी यह,
जरा बलिदान याद करे,
और देशप्रेम की राह चले,
कुछ जला अब पथ पर दिए,
प्रज्वलित अमर बलिदान करे।।

– अरुणिमा बहादुर खरे

आमचे सोशल मीडिया

माहितीस्तव चे whatsapp चॅनल

 माहितीस्तव चे facebook चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment