Sugarcane Season 2024
Sugarcane Season 2024 राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे गाळप हंगाम 2021-22 मधील देय असलेल्या प्रती टन चार रुपयांपैकी तीन रुपयांचा भरणा केल्याशिवाय संबंधित साखर कारखान्यांना 2024-25 हंगामाचा गाळप परवाना देण्यात येणार नाही, असे परिपत्रक साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जारी केले आहे.
हेही वाचा – sugar cane : विस्मा कडून ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्याची मागणी..
राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
Sugarcane Season 2024 या महामंडळासाठी साखर कारखान्यांनी प्रतिटन दहा रुपये दरवर्षी महामंडळाच्या खात्यात जमा करावयाची आहेत. याबाबत राज्याच्या साखर आयुक्तालयाने ता. 30 ऑक्टोबर 2023 व नंतर काढलेल्या तीन पत्रांद्वारे साखर कारखान्यांनी ऊसतोड महामंडळाची रक्कम द्यावी असे निर्देश दिले होते.
याचा उल्लेख करून साखर आयुक्तांनी ता. 9 ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, गाळप हंगाम 2021-22 मध्ये झालेल्या गाळपावरील उर्वरित रक्कम प्रती टन चार रुपये ही हंगाम 2023-24 संपल्यानंतर 15 एप्रिल 2024 पर्यंत भरणा करावी.
हेही वाचा – POCRA-2 महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार पोकरा 2
गाळप हंगाम 2022-23 मध्ये झालेल्या गाळपावरील रुपये 10 प्रतिटनापैकी पाच रुपये निधीची रक्कम ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत व उर्वरित पाच रुपये रक्कम ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत भरणा करण्यासंदर्भात सूचना वेळावेळी दिल्या आहेत
आता 2021-22 मधील देय रक्कम दिली नाही तर गाळप परवाना दिला जाणार नाही, असेही पत्रात नमुद केले आहे. ही कार्यवाही 23 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार त्वरित करावी, असे खेमनार यांनी दिले आहेत
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.