Solar pamp yadi :
Solar pamp yadi: सोलार पंप यादी या योजनेची सोलर पंप लाभार्थी 2024 ची यादी शासनाच्या संकेतस्थळावर पीएम कुसुम ( PM Kusum )उपलब्ध झाली आहे.
Solar pamp yadi : केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान म्हणजेच पीएम कुसुम ( PM Kusum ) ही योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जातात. या योजनेची सोलर पंप लाभार्थी 2024 ची यादी शासनाच्या संकेतस्थळावर पीएम कुसुम वेबसाईट वर उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरही ही यादी पाहता येणार आहे.
तर जाणून घेऊ Solar pamp yadi : सोलार पंप यादी पाहण्याची प्रक्रिया…
- सर्वप्रथम खालील केंद्र सरकारच्या पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या https://pm kusum.mnre.gov.in/ या पोर्टलला भेट द्या.
- यानंतर पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल हे पोर्टल ओपन होईल.
- यात होम पेजवर सर्वात शेवटी असलेले पब्लिक इन्फॉर्मेशन या पर्यायात असलेल्या Scheme Beneficiary List स्कीम बेनिफिशरी लिस्ट यावर क्लिक करा.
- यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. यात आपले राज्य, जिल्हा, पंप क्षमता आणि इन्स्टॉल केल्याचे वर्ष असे पर्याय दिसतील.
- या पर्यायानुसार आपले राज्य यात MAHARASHTRA-MEDA व MAHARASHTRA -MSEDCL असे दोन पर्याय दिसतील. यापैकी कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे तो पर्याय निवडायचा आहे.
- यानंतर जिल्हा, पंप क्षमता, तीन एचपी, पाच एचपी इन्स्टॉल केल्याचे वर्ष निवडायचे आहे. आणि Go वरती क्लिक करायचं आहे.
- नवीन विंडो ओपन होईल, यात ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे. अशा लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव, जिल्हा, गाव’ सोलर कोणत्या कंपनीचा भेटलेला आहे. याबाबतची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. तसेच ही यादी आपण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.