Soybean सोयाबीन खरेदीला गती,
Soybean बारदान्याचा तुटावड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. खरेदीलाही मोठी गती आली आहे. आजवर १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. तर निकषात बसणाऱ्या ६ हजार ३२८ क्विंटल सोयाबीनचे रू.४८९२ या हमीभावाप्रमाणे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसाच्या आत रक्कम जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी केली नाही त्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करून घ्यावी.
हेही वाचा- Soybean Procurement : सोयाबीन खरेदीत हवेचा
(ओलाव्याचा) निकष 12% वरून 15% वर
धाराशिव जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या काळात बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया आपण तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला. त्यामुळे आता हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला मोठी गती आहे. परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. ज्या शेतकर्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी.
Soybean धाराशिव जिल्ह्यातील खरेदी केंद्र
जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी १७ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. ६ हजार ३२८ क्विंटल सोयाबीनचे रू. तीन कोटी नऊ पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यापूर्वी Soybean सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती.
अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राच्या प्रक्रियेला मुदत वाढ मिळावी अशी मागणी आपण केली होती. त्यानंतर त्यात वाढ करून आता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी.
हेही वाचा-MSP हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनचे
पैसे बँकेत जमा होण्यास सुरुवात.
चार दिवसात सोयाबीनचे पैसे खात्यात जमा
यापूर्वी Soybean सोयाबीन विक्रीचे पैसे मिळावे याकरिता चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता चार दिवसांच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. आजवर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यात रू. तीन कोटी नऊ जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर 12 टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घ्यावी.
उर्वरित शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावी
यंदा Soybean ला खूप कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सोयाबीन पिकाला जो भाव दिला आहे त्या भावाने सध्या राज्यात सोयाबीन खरेदी केली जात आहे . सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तेथे सोयाबीनची खरेदी करून लवकरात लवकर आपल्या बँक खात्यात सरकार कडून पैसे जमा केले जात आहेत. त्या साठी शेतकऱ्यानं खरेदी केंद्रवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी लागते.मग आपला नंबर आल्यास सोयाबीन घेऊन खरेदी केंद्रावर जावे लागेल.
खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.त्या मुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद करून घेतली पाहिजे .
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.