Sant मेंढा येथे श्री संत अण्णा महाराज समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह 2024

“संत चरण लागता सहज ।

वासनेचे बीज जळून जाय” ।।

Santश्री ब्र. भु. ह. भ. प. संत अण्णा महाराज

श्री. ब्र. भु. ह. भ. प. संत Sant अण्णा महाराज यांच्या व्या समाधी सोहळ्यानिमिताने या हि वर्षी श्री भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह चे मेंढा येते जर वर्षी प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे. श्री. संत अण्णा महाराज याच्या पदपावन स्पर्शाने पवित्र झालेल्या मेंढा नगरीत एक भव्य दिव्या असा अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा होणार आहे .

प्रारंभ – दि. 11/12/2024

श्री संत Sant अण्णा महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री. गोरोबा काका तेर येथे 42 वर्ष सेवा केली. त्यायोगे या भूमीचे व परिसराचे उद्धाराचे कार्य पूर्ण केले. त्यांनी मौजे मेंढा ता. धाराशिव येतेच श्री विठ्ठल रुक्मिणीचे अप्रतिम मंदिर निर्माण केले व याच भूमीत देह ठेवला. त्याची समाधी स्थापना करून त्याच्या यावर्षी 35 `वा समाधी सोहळा साजरा होत आहे.श्री क्षेत्र मेंढा येथे श्री संत अण्णा महाराजाचे समाधी मंदिर गावकार्यानी व परिसरातील भाविकांनी बांधले आहे.

हेही वाचा – श्री संत अण्णा महाराज मेंढा ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा-2024

मेंढा येथे 11 डिसेंबर पासून शिवपुराण कथा व अखंड हरीनाम सप्ताह

धाराशिव तालुक्यातील मेंढा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत Sant अण्णा महाराज यांच्या 35 व्या समाधी सोह्ल्यानिमित 11 डिसेंबर पासून अखंड हरीनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. व शिवपुराण कथा गुलाब महाराज राउत यांची होणार आहे.

Sant

या सप्ताहात भरगच्च कार्यक्रम असून यात नामवंत कीर्तनकाराची कीर्तने होणार असुन याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे, आव्हान ग्रामस्थांनी केले आहे. 11 डिसेंबर रोजी रात्री ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडी यांची कीर्तन सेवा होईल. 12 डिसेंबर रोजी ह. भ. प. संतोष महाराज पायगुडे यांचे कीर्तन सेवा होईल. 13 डिसेंबर रोजी ह. भ. प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन सेवा होईल. 14 डिसेंबर रोजी ह. भ. प. अर्जुन महाराज मोठे यांचे कीर्तन सेवा होईल. 15 डिसेंबर रोजी ह. भ. प. अर्जुन महाराज लाड यांची कीर्तन सेवा होईल. 16 डिसेंबर रोजी ह.भ.प. चैतन्य महाराज वासकर यांची कीर्तन सेवा होईल. व 17/12/2024 रोजी काल्याचे किर्तन महेश महाराज कानेगावकर माकणी संस्थान यांचे होईल.

तरी भाविकांनी कीर्तन व शिवपापुराण त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे विनंती मेंढा येथील गावकऱ्यांनी केली आहे. काला कीर्तन झाल्यानंतर काला वाटाप निवृत्ती महाराज रिंगणीकर हस्ते होईल. त्यानंतर प्रसाद होईल. 18 डिसेंबर रोजी शिवली वरवडा जायफळ गुळखेळवाडी टाका कामेगाव बोरपळ माटेफळ यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल

शिवपुराण कथा

शिवपुराण कथा प्रवक्ते परम श्रद्धेय प.पु. गुलाब महाराज राउत आळंदीकर (विदर्भ रत्न) यांच्या कथेचे आयोजन या वर्षी श्री संत Sant अण्णा महाराज यांच्या 35 व्या समाधी सोहळ्या निमिताने केले आहे. कथा प्रारंभ दिनांक 10/12/2024 रोजी होईल. कथेचा शेवट दिनांक 16/12/2024 म्हणजे काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी. कथा सुरु होण्याची वेळ दुपारी 2 ते 5.00 हि असेल.

आमचे सोशल मीडिया

माहितीस्तव चे facebook चॅनल

माहितीस्तव चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.