तुमच WhatsApp दुसरं कुणी वापरतंय का? कसं शोधाल? ट्रिक्स जाणून घ्या

WhatsApp

WhatsApp आपल्या आयुष्यातील एक प्रकारचा महत्त्वाचा घटक बनला आहे. पण, तुम्हाचे WhatsApp नकळत कुणी वापरत असेल तर? असे आढळल्यास आपण काय कराल? कारण, असे झाल्यास तुमच्या प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला WhatsApp सुरक्षित कसे ठेवावे, याविषयीच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे WhatsApp अकाऊंट इतर कोणी वापरत आहे की नाही हे शोधू शकता.

याविषयी खाली विस्ताराने माहिती जाणून घ्या.


WhatsApp आजकाल सर्व ठिकाणी, ऑफिसमध्ये देखील वापरले जाते. यात आपण अनेकदा महत्त्वाची माहिती देतो. यामुळे WhatsApp अकाऊंट सुरक्षित असावे, असे आपल्याला प्रत्येकालाच वाटते. पण, याचवेळी जर तुमचं WhatsApp दुसरं कुणी वापरत असेल तर? अशा वेळी तुम्ही काय कराल, याच प्रश्नांची उत्तर आम्ही आज देणार आहोत. विशेष म्हणजे अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचे WhatsApp सुरक्षित वापरू शकाल.

हेही वाचा~ फेसबुक ॲपचे प्रमुख फीचर्स Facebook चे व्यवसाय मॉडेल आणि जाहिराती.


WhatsApp सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. याचा वापर लोक आपल्या मित्र-मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी गप्पा मारण्यासाठी, ऑडिओ-व्हिडिओ कॉल करण्यासाठी आणि फाईल्स शेअर करण्यासाठी करतात. कंपनी आपल्या युजर्सना अनेक उत्तम फीचर्स देखील ऑफर करते जे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

तुमचं WhatsApp दुसरं कुणी वापरतंय का?

WhatsApp वर लोकांच्या वैयक्तिक गप्पा होतात. त्यामुळे जर दुसरं कुणी तुमचं WhatsApp अकाऊंट वापरत असेल तर तुमची प्रायव्हसी धेक्यात येईल. आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे WhatsApp अकाऊंट इतर कोणी वापरत आहे की नाही, हे शोधू शकता

कॉम्पॅनियन मोड काय आहे?


WhatsApp वर कॉम्पॅनियन मोड नावाचे एक अतिशय उपयुक्त फीचर आहे. या फीचरमुळे लोक आपले WhatsApp अकाऊंट एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर वापरू शकतात. युजरचं काम सोपं व्हावं, यासाठी हे फीचर आणण्यात आलं आहे. पण, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मेसेज कोणी तरी वाचत आहे, तर तुम्हीही या फीचरचा वापर करून हे जाणून घेऊ शकता. ते कसं करायचं याविषयी जाणून घ्या.

हेही वाचा~ Google Play Store अँप्स चे भंडार

‘या’ पायऱ्या वापरा


सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा.
होमस्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
यानंतर पॉप-अप मेनू ओपन होईल.
येथे आपण लिंक केलेल्या डिव्हाईसवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
येथे तुम्हाला त्या सर्व डिव्हाईसची यादी मिळेल जिथे तुमचे WhatsApp अकाऊंट लिंक केले जाईल.
तसेच इथून तुम्ही त्या सर्व डिव्हाईसमधून तुमच्या WhatsApp अकाऊंटमधून लॉग आऊट करू शकाल.

वरील माहिती तुम्हाला तुमचं WhatsApp इतर कुणी वापरतंय का, हे शोधण्यासाठी मदत करेल. तसेच इतर डिव्हाईसवरुन लॉग आऊट करता येईल. यामुळे तुमचे WhatsApp सुरक्षित राहिल.

आमचे सोशल मीडिया

माहितीस्तव चे whatsapp चॅनल

 माहितीस्तव चे facebook चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment