नमस्कार आज आपण एका नवीन विषयावर ब्लॉग बनवणारा आहोत. आज आम्ही तुम्हला मोबाईल किंवा कॉम्पिटर मध्ये जे अँप आपण वापरतो. त्या बेस्ट UPI अँप विषयी सविस्तर माहित या ब्लॉग च्या माध्यमातून माध्यमातून देण्यात येणार आहे. जे अँप आपल्या कामाचे आहेत. त्याच ब्लॉग ची माहिती आपणाला दिली जाईल. ते बेस्ट अँप कसे डाउनलोड करायचे कसे इन्स्टोल करायचे ते काय काम करते. त्याचा उपयोग काय आहे. ते अँप कसे काम करते. त्याची रेटिंग किती आहे, या सर्व विषयावर सखोल माहिती आम्ही तुम्हला देणार आहोत.
तर आज आपण भारतात जे पेमेंट अँप आहेत त्यांच्या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. ते म्हणजे फोनपे, गुगल पे, पेटीएम, आणि इतर बरेच अँप याच्या विषयी सविस्तर माहिती पाहुयात.
UPI
एकात्मिक भरणा पद्धती – युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे पाठवण्याची किंवा घेण्याची सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. 11 एप्रिल 2016 पासून भारतीय रिझर्व बँक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु.10 व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बँकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्यक नसते.

गेल्या 5 वर्षात भारतात डिजिटल पेमेन्टचे प्रमाण वार्षिक सरासरी 50 % दराने वाढले आहे. ही लक्षणीय कामगिरी मुख्यतः नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित केलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला आहे. UPI ही एक तात्काळ पेमेंट प्रणाली आहे ज्याद्वारे तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या, दर महिन्याला सुमारे 200 कोटी UPI व्यवहार केले जातात, त्यापैकी एक मोठा हिस्सा थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हायडर्स (TPAPs) द्वारे होतो. आर्थिक क्षेत्रात, अधिक चांगल्या आणि अधिक सुसंगत वापरकर्त्याच्या अनुभवासाठी विविध सेवा तयार करण्यासाठी तृतीय-पक्ष ॲप्स अनेकदा बँकिंग ॲप्लिकेशनशी जोडलेले असतात.
UPI चे उपयोग
सध्या UPI च्या माध्यमातून ती सर्व कामे करता येतात जी नेट बँकिंग ने करत होतो. जसे कि रिचार्ज, पैसे पाठवणे, पैसे घेणे, वस्तू खरेदी करणे, बिल भरणे, तिकीट, इत्यादी सर्वच कामे आपण आपल्या मोबाईल UPI च्या माध्यमातून करू शकतो. जवळ पास 25 हुन अधिक UPI अँप्स play store उपलबध आहेत.
UPI फायदे
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बँक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
- पैसे चोरीला जात नाहीत.
- वेळ प्रसंगी आपण कधीही पैसे काढू शकतो.
टॉप 3 UPI अँप्स

भारतात पेमेंट अँप चा विचार केला तर आपल्या असे लक्षत येईल कि जवळपास 25 अँप play store ला उपलब्ध आहेत. त्यात फोनपे । PhonePe, BHIM App, PayTM,Google Pay, Axis Pay, CRED, अमेझॉन पे अशे अनेक अँप store ला उपलब्ध आहेत, त्यातील मुख्य टॉप तीन अँप विषयी माहिती आपण पाहणारा आहोत. ते म्हणजे PhonePe, Google Pay, PayTM,यांच्या विषयी माहिती घेऊयात.
phonepe
भारतातील मुख्य अँप पैकी एक अँप म्हणजे फोन पे जे वापरून आपण त्याच्या माध्यमातून जवळपास 45 % व्यवहार करतो जे यूजर च्या पसंतीस पडलेले अँप आहे. PhonePe ही एक भारतीय बहुराष्ट्रीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी आहे तिचे मुख्यालय बेंगळुरू , कर्नाटक , भारत येथे आहे . PhonePe ची स्थापना डिसेंबर 2015 मध्ये झाली, समीर निगम, राहुल चारी आणि बुर्झिन इंजिनियर यांनी. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ( UPI ) वर आधारित PhonePe ॲप ऑगस्ट 2016 मध्ये लाइव्ह झाला
phonepe टीम विषयी
- समीर निगम : समीर निगम यांनी 2015 मध्ये PhonePe ची स्थापना केली आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले.
- राहुल चारी हे PhonePe चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत. एम्बेडेड सिस्टम, एंटरप्राइझ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म.
- बुर्झिन अभियंता बुर्झिन हे PhonePe चे मुख्य विश्वसनीयता अधिकारी आहेत. डॉट-कॉम स्पेसमध्ये त्यांना 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
phonepe विषयी
फोन पे च्या माध्यमातून आपण सुरक्षित पणे आपले upi व्यवहार करू शकतो.तेसच मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल, म्युच्युअल फंड, सोने, विमा सुद्धा उतरवू शकतो.
- फोन पे हे एक पेमेंट अँप आहे जे तुम्हाला BHIM UPL, तुमचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड किंवा वॉलेट वापरून तुमचा मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी तुमची सर्व युटिलिटी बिले भरण्यासाठी आणि तुमच्या आवडत्या ऑफलाईन आणि ऑनलाईन स्टोअरमध्ये झटपट पेमेंट करता येते.
- तुम्ही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता आणि फोनपे वर विमा योजना खरेदी करू शकता.
- या अँप च्या माध्यमातून आपण कार आणि बाईक चा विमा हि काढता येतो.
- phonepe अँप सुरक्षित आहे .
- तुमचे सर्व पेमेंट,गुंतवणूक, म्युच्युअल फंड, विमा आणि बँकिंग गरज पूर्ण करते आणि इंटरनेट बँकिंगपेक्षा बरेच चांगले आहे.
phonepe वरून तुम्ही काय करू शकता ?

- मनी ट्रान्सफर, upi पेमेंट, बँक ट्रान्सफर, हि कामे करू शकता.
- BHIM UPI सह मनी ट्रान्सफर सुद्धा करू शकता.
- या अँप मध्ये तुम्ही एकापेक्षा ज्यास्त बँक खाती जोडू शकता.
- तुमच्या बँक खात्यात किती रक्कम आहे. याची माहिती तुम्ही घरी बसल्या पाहू शकता .
- HDFC ,SBI, ICICI,आणि 140+ बँका तुम्ही फ़ोनपे मध्ये समाविष्ट आहेत.
ऑनलाईन पेमेंट करू शकता
- Flipkart, Amazon , Myntra , इत्यादी विविध शॉपिंग साइड्सवर ऑनलाईन पेमेंट करू शकता.
- Zomato ,Swiggy ,इत्यादी ऑनलाईन फूड ऑर्डर करून त्याचे ऑनलाईन पेमेंट करू शकतो.
- बिगबास्केट , ग्रोफर्स इत्यादींकडून ऑनलाईन किराणा ऑर्डर करून त्याचे पिसे पाठवता येतात
- Makemytrip, Goibibo इत्यादी वरून प्रवास बुकिंग साठी ऑनलाईन पैसे पाठवता येतात.
ऑफलाईन पेमेंट करा
- किराणा खाद्यपदार्थ, औषधे,इत्यादी वस्तू किंवा स्थानिक स्टोअरमधे QR कोड द्वारे स्कॅन करा आणि पैसे पाठवा.
phonepe इन्शुरन्स अँपसह विमा पॉलिसी खरेदी करा किंवा नूतनीकरण करा
आरोग्यविमा
- मासिक प्रीमियमसह आरोग्य विमा तुलना करा आणि खरेदी करा.
- भारतातील सर्वोत्तम रेट केलेल्या विमा कंपन्यांकडून वैधकीय विमा उतरवू शकतो.
- व्यावसायिक, जेष्ठ नागरिक आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा आपण phonepe च्या माध्यमातून करू शकतो.
विमा
- बाइक विमा : तुमच्या टू व्हीलर संरक्षणासाठी भारतातील सर्वोत्तम रेट केलेल्या बाइक विमा प्रदात्याकडून पॉलिसी मिळवता येईल.
- कार विमा : तुमच्या 4 चाकी वाहनाच्या संरक्षणासाठी phonepe कडे भारतातील सर्वोत्तम पॉलिसी phonepe च्या माध्यमातून घेऊ शकतो.
- वैयक्तिक अपघात विमा : अपघात च्या माध्यमातून आपणाला जे अपंगत्व येते त्या संदर्भात विमा काढ्याचा असल्यास त्याचा विमा आपण काढू शकतो.
- जीवन विमा : मासिक प्रीमियम सह जीवन विमा पॉलीसी आपण खरेदी करू शकतो. भारतातील सर्वोत्तम किमतीच्या आणि चांगल्या कंपनीच्या पॉलीसी आपण येथून खरेदी करू शकतो.
- प्रवास विमा : डोमेस्टिक मल्टी-ट्रिप इन्शुरन्स व्यवसायासाठी आणि विश्रंतीच्या सहलीसाठी घरगुती प्रवास विमा आपण फोन पे च्या माध्यमातून मिळवू शकतो.
- त्याचा बरोबर आंतराष्ट्रीय प्रवास विमा आपण याच्या माध्यमातून सहज मिळवू शकतो.
- दुकान विमा : आपल्या दुकानात आग, नैसर्गिक आपत्ती आणि घरफोड्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या दुकानाचा विमा आपण फोन पे च्या माध्यमातून आपण काढू शकतो.
म्युच्युअल फंड अँप
- म्युच्युअल फंड अँप आणि गुंतवणूक अँप
- लिक्विड फंड गुंतवणूक : तुमच्या बचत बँक खात्यापेक्षा जास्त परतावा यातून मिळत असतो. त्यात गुंतवणूक करण्यासाठी आपण फोनपे ची मदत घेऊ शकतो.
- कर बचत निधी रु पर्यंत बचत करा46800 कर आणि तुमची गुंतवणूक वाढवा.
- सुपर फंड : आमच्या गुंतवणूक अँपवर तज्ज्ञांच्या मदतीने तुमची आर्थिक उद्दिष्ट साध्य करा.
- इक्विटी फंड गुंतवणूक : तुमच्या जोखीमीच्या क्षमतेनुसार तयार केलेल्या उच्च वाढ उत्पादने आपण घेऊ शकतो.
- डेट फंड : कोणत्याही लॉक इन कालवाढीशिवाय तुमच्या गुंतवणुकीसाठी स्थिर परतावा मिळवता येतो.
- हायब्रीड फंड गुंतवणूक :वाढ आणि स्थिरता यांचा समतोल साधता येतो.
- 24 k शुद्ध सोने खरेदी किंवा विक्री करा. 24k शुद्धतेची खात्री मिळावा आणि आमच्या गुंतवणूक अँप वर तुमची सोन्याची बचत करा.
मोबाईल, DTH, रिचार्ज
Jio, vodafone , idea, airtel इत्यादी प्रीपेड मोबाईल नंबर रिचार्ज करू शकता. तसेच टाटा स्काय एअरटेल डायरेक्ट, सॅन डायरेक्ट, व्हिडिओकॉन इत्यादी डीटीएच रिचार्ज सुद्धा आपण करू शकतो.
Bill payment
- क्रेडिट कार्ड बिले भरा.
- लँडलाईन बिले भरा
- वीज बिल भरणा
- पाण्याचे बिल भ्र्रा
- गॅस बिले भरा
- ब्राँडबँड बिले भरा
Permissions For App
आपण फोन पे चे अँप आपल्या मोबाईल मध्ये समाविष्ट केल्या नंतर ते आपल्याला काही परवानग्या मागत असते.त्या देणे आवश्यक असते.
- एसएमएस : फोन पे मध्ये एसएमएस ची पर्वणी आवश्यक असते. कारण त्या शिवाय आपण आपला फोन नंबर त्यामध्ये सत्यापित करू शकत नाही.
- स्थान : UPI व्यवहारासाठी NPCI ची म्हणजे स्थानिक लोकेशन ची परवानगी आवश्यक असते.
- संपर्क : पैसे पाठ्वण्या साठी आणि रिचार्ज करण्यासाठी फोन नंबर लागतात. त्यासाठी आपल्या मोबाईल च्या संपर्क यादीची परमिशन देणे आवश्यक असते.
- कॅमेरा : QR कोड स्कॅन करण्यासाठी त्याची परमिशन लागते.
- स्टोरेज: स्कॅन केलेलं QR कोड साठवण्या साठी याची आवश्यकता असते.
- खाती : साइन अप करताना ईमेल आयडी प्री – पाप्युलेट करण्यासाठी याची आवश्यकता असते.
- कॉल करा : सिंगल वि ड्युअल सिम शोधण्या साठी आणि वापरकर्त्याला निवडून द्या
- मायक्रोफोन : केवायसी व्हिडिओ पडताळणी करण्यासाठी
पात्रता
- तुमचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- तुम्ही करार/कायदेशीर बंधनकारक करार करण्यास सक्षम असावा
- PhonePe सेवांच्या “वापर अटी” मधील सर्व तरतुदींचे पालन करून तुम्हाला या करारामध्ये ॲक्सेस करण्याचा हक्क, अधिकार आणि क्षमता आहे.
- भारतीय कायद्यांतर्गत PhonePe किंवा PhonePe संस्थांच्या सेवा ॲक्सेस करणे किंवा वापरणे यांसाठी तुमच्यावर बंधन नाही किंवा अन्य कायदेशीररित्या अडवणूक केली जात नाही.
- तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे किंवा संस्थेचे सोंग घेत नाही किंवा तुमचे वय किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा घटकाशी खोटी संलग्नितता सांगत नाही. नमूद केलेल्या अटींसंदर्भात कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रतिनिधित्व करत असल्यास, PhonePe आणि PhonePe संस्था PhonePe प्लॅटफॉर्म वापरण्याचा तुमचा करार संपवण्याचा अधिकार राखून ठेवतील.
- अनिवार्य माहिती आणि अधिकृतपणे वैध कागदपत्रे “OVD”/ तुम्ही नमूद केलेले दस्तऐवज तपशील खरे आणि बरोबर आहेत आणि ते सर्वस्वी तुमचेच आहेत. आईची खात्री करावी.
साइन-अप / नोंदणी
PhonePe सेवांचा संपूर्ण स्पेक्ट्रम वापरण्यासाठी तुम्हाला PhonePe ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि आम्हाला अचूक आणि संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमची खाती, KYC तपशील आणि संपर्क माहिती नेहमी पूर्ण आणि अपडेट ठेवणे देखील आवश्यक आहे.
एकदा तुम्ही PhonePe वर साइन-अप केल्यानंतर, तुम्ही फोन खात्यासाठी पात्र होता. तुम्ही PhonePe वेबसाईट आणि ॲप्लिकेशनवर उपलब्ध असलेल्या काही अटी आणि मर्यादांच्या अधीन राहून कोणत्याही तृतीय पक्ष व्यापारी प्लॅटफॉर्मवरून PhonePe वर नोंदणी देखील करू शकता. एकदा PhonePe वर नोंदणी केल्यानंतर, काही सेवा तुम्हाला अतिरिक्त माहिती मागू शकतात किंवा अशा सेवेचा लाभ घेऊ शकतात आणि अशा सेवांचा लाभ घेण्यासाठी उप-खाती तयार करणे यांचा समावेश असू शकतो.
तुम्ही ज्या डिव्हाइसवर PhonePe ॲप डाउनलोड करता आणि नोंदणीदरम्यान वापरता, ते तुमचे नोंदणीकृत डिव्हाइस होईल आणि डिव्हाइसचे तपशील आम्ही स्टोअर करू. ज्या क्षणी तुम्ही PhonePe ॲप वापरून तुमच्या PhonePe खात्यात वेगळ्या डिव्हाइसवरून लॉगिन कराल, तेव्हा तुम्हाला PhonePe ला नवीन डिव्हाइसवरून SMS पाठवण्याची परवानगी देण्यास सांगितले जाईल, त्यानंतर नवीन डिव्हाइस नोंदणीकृत डिव्हाइस बनते. जोपर्यंत तुम्ही पुन्हा लॉगिन करत नाही आणि त्या डिव्हाइसवर स्वत:ला पुन्हा अधिकृत करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे मागील डिव्हाइस वापरून तुमच्या PhonePe खात्यात ॲक्सेस करू शकणार नाही.
तुमचा फोन नंबर ज्याचा वापर करून तुम्ही PhonePe वर नोंदणी केली आहे, तो कोणत्याही कारणास्तव ट्रान्सफर, सरेंडर आणि/किंवा निष्क्रिय केला गेल्याच्या घटनेत, या संदर्भात PhonePe ला माहिती देण्याची जबाबदारी तुमची असेल.
हे तुमचे PhonePe खाते सुरक्षित करण्यासाठी PhonePe ला सक्षम करेल. जर दुसर्या व्यक्ती/व्यक्तीने ट्रान्सफर, सरेंडर आणि/किंवा निष्क्रिय केलेला फोन नंबर वापरून नोंदणी करायची असेल तर, PhonePe ला मागील PhonePe खातेधारकाचे तपशील काढून टाकण्यासाठी/डिलिंक करण्यासाठी वेळ लागेल आणि त्याद्वारे, खाते पुन्हा सेट करण्यासाठी विनंतीच्या तारखेपासून दोन (2) वर्षांपर्यंतचा वेळ लागू शकतो.

phonepe वर बँक खाते कसे जोडावे ?
UPI पेमेंट करण्यासाठी आणि इतरांकडून पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे वर्तमान चालू बँक खाते phonepe वर लिंक करू शकता. असे करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टीची खात्री करणे आवश्यक आहे.
- तुमचा phonepe वरील मोबाईल नंबर आणि बँकेकडील नोंदणीकृत मोबाईल नामाबर एकाच असायला हवा.
- तुम्ही जोडू इच्छित असलेल्या बँक खात्यासाठी तुम्ही मोबाईल बँकिंग सेवा सक्रिय केलेली असायला हवी. मोबाईल बँकिंग सक्रिय करण्यासाठी, तुम्ही तुमच्या बँकेककडे संपर्क करू शकता.
- सत्यपणासाठी sms पाठ्वण्यासाठी या मोबाईल नंबर मध्ये पुरेसा बॅलेन्स असायला हवा. तुम्ही तुमच्या कोणत्याही संपर्कास sms पाठवून हे तपासू शकता.
- चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल नेटवर्क उपलब्ध असायला हवा.
बँक खाते जोडण्यासाठी
- phonepe अँपच्या होम स्क्रिनवर तुमच्या प्रोफाइल फोटो वर किल्क करा.
- view all payment methods/ सर्व पेमेंट पद्धती पहा वर क्लिक करा. आणि बँक खाती विभाग अंतर्गत add new / नवीन जोडा वर टॅप करा.
- सूची मधून तुमची बँक निवडा. तुम्ही सर्च बारवर नाव टाकून सुद्धा तुमची बँक शोधू शकता.
- जर तुमची बँक सूचीमध्ये
ऑफर्स
PhonePe किंवा PhonePe संस्था तुम्हाला वेळोवेळी कोणत्याही ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करू शकतात. तुम्ही सहमत आहात की अशा ऑफरमध्ये भाग घेणे संबंधित ऑफरच्या अटी आणि शर्तींच्या तुमच्या कराराच्या अधीन आहे. तुम्हाला हेही समजते की PhonePe प्लॅटफॉर्मवर तृतीय पक्षांद्वारे ऑफर दिल्या जाऊ शकतात आणि तुम्हाला तृतीय पक्षांच्या संबंधित अटी व शर्तींना सहमती द्यावी लागेल. तुम्ही पुढे सहमत आहात की कोणत्याही युजरला प्रदान केलेल्या ऑफर युजरनुसार बदलू शकतात.
तुम्ही अशा ऑफरसाठी पात्रता निकषांची पूर्तता न केल्यास किंवा ऑफरचा गैरवापर, चुकीचे वर्णन, फसवणूक किंवा संशयास्पद व्यवहार/ॲक्टिव्हिटी यासह पण PMLA निर्देश किंवा अन्य कोणत्याही निर्देशांपर्यंत मर्यादित नसलेल्या इतर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला कोणत्याही ऑफरमधून अपात्र ठरवण्याचा अधिकार PhonePe पुढील सूचना न देता आमच्या विवेकबुद्धीनुसार राखून ठेवते.
तृतीय पक्षाच्या अटी व शर्ती
तुम्ही समजता की आम्ही या सेवांचे मालक नाहीत आणि आणि तुम्हाला त्यांच्या संबंधित अटी आणि शर्ती स्वीकारण्याची आवश्यकता असू शकते आणि PhonePe प्लॅटफॉर्मवर तृतीय पक्षांद्वारे दिलेल्या अशा उत्पादनांचा/सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त माहिती शेअर करण्याची आवश्यकता असू शकते, PhonePe कोणतीही जबाबदारी घेत नाही. तृतीय पक्षाच्या वेबसाइट किंवा ॲप्लिकेशनद्वारे तुमच्याकडून गोळा केलेली माहिती आणि आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाच्या कृतींसाठी तुमची नुकसानभरपाई करू शकत नाही.
नुकसानभरपाई
तुम्ही PhonePe, PhonePe एंटिटी, त्यांचे मालक, परवानाधारक, सहयोगी, उपकंपन्या, समूह कंपन्या (लागू असल्याप्रमाणे) आणि त्यांचे संबंधित अधिकारी, संचालक, एजंट आणि कर्मचारी यांना कोणतेही दावे किंवा मागण्या किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे आकारलेले वकिलांचे वाजवी शुल्क किंवा देय दंड किंवा वापराच्या अटींचे, गोपनीयता धोरणांचे आणि अन्य धोरणांच्या
उल्लंघनामुळे किंवा कोणत्याही कायद्याच्या, नियमांच्या किंवा नियमकांच्या किंवा तृतीय पक्षाच्या (बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन) हक्कांच्या उल्लंघनामुळे उद्भवणाऱ्या नुकसानासाठी जबाबदार धरणार नाही आणि निरपराध मानाल.
माहितीस्तव चे facebook चॅनल
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.