sugar cane : विस्मा कडून ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्याची मागणी..

sugar cane

sugar cane : विस्मा कडून ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्याची मागणी. राज्य सरकारने ऊस गाळप हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू करावा अशी मागणी द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजेच विस्माने केली आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतरच गाळप हंगाम सुरू होईल अशी चर्चा समाज माध्यमावर सुरू आहे.

हेही वाचा ~ punjabrao dakh : म्हणतात राज्यात या तारखेपर्यंत पावसाचे वातावरण ! 2024

राज्यातील ऊस गाळप हंगाम 10 दिवस लांबणीवर पडला तर कारखानदारांसोबतच, शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने ऊस गाळप हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू करावा अशी मागणी द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजे विस्मा केले आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतरच गाळप हंगाम सुरू होईल. अशी चर्चा समाज माध्यमावर सुरू आहे.sugar cane


राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीच्या मैदानात बहुतांश साखर कारखानदार उतरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निश्चित केलेला गाळप हंगामाची तारीख दोन आठवडे पुढे जाऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. (sugar cane) विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. परंतु त्यामुळे गाळप हंगाम लांबणीवर पडू शकतो. अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

हेही वाचा ~ Maharashtra Rain : महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस.

विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे बिजनेसलाईन वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले; गाळप हंगाम सुरू करण्यासाठी आधीच उशीर झाला आहे. आम्ही राज्य सरकारकडे पाच नोव्हेंबर पासून गाळात हंगाम सुरू करण्याची मागणी केली होती. प्रांती मंत्री समितीने 15 नोव्हेंबर तारीख निश्चित केली, असे ठोंबरे म्हणाले. राज्य सरकारने गाळप सुरू करण्यास विलंब केल्यामुळे राज्यातील साखर कारखान्याच्या प्रशासनातील नोकरदरापासून कामगार, ऊसतोड मजूर, वाहतूकदार, यांच्यावर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. तसेच शेतकरी देखील गाळप हंगाम सुरू होण्याची वाट पहात आहे. असेही ठोंबरे यांनी सांगितले.


दरवर्षी साधारण ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो. त्यामुळे कारखान्यावर लगबग सुरू असते, परंतु यंदा मात्र 15 नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख राज्यमंत्री समितीने निश्चित केली. त्यामुळे कारखानदार, ऊस उत्पादक, मजूर, वाहतूकदार, गाळप हंगाम सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा ~ई-पीक पाहणी | E Pik Pahani app 2024


दरम्यान महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 10 ते 15 नोव्हेंबर च्या काळात गाळप हंगाम सुरू होईल. त्यामुळे राज्यातील ऊस या राज्यातील कारखाने पळवतील परिणामी राज्यातील साखर कारखान्यांना ऊस कमी पडेल. अशी चिंता ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे. sugar cane

आमचे सोशल मीडिया

माहितीस्तव चे whatsapp चॅनल

 माहितीस्तव चे facebook चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment