Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये..?

Ladki Bahin Yojana :

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर या योजनेत महिलांना आता दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल महायुती च्या प्रचाराचा नारळ फोडला. या प्रचार सभेत मुख्यमंत्री यांनी बोलताना माहिती दिली. लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी कोल्हापूर मधील महायुतीच्या प्रचार सभेत केली.

मुख्यमंत्र्यांनी या सभेत दहा मोठ्या घोषणा केल्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत मी बोलतो ते काय विरोधक करतायेत. कशी त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना धडकी भरली आहे. त्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून लाडक्या बहिणींना पंधराशे वरून 2100 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो . असे मुख्यमंत्री म्हणाले;

हेही वाचा ~Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना, डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी बातमी!

महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलं आहे. महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना पंतप्रधान मोदींनी 6000 ते 12000 ही सन्मान योजना वर्षाला 15000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि MSP वर 20 % अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याच वचन देखील आम्ही या ठिकाणी देत आहोत. या महाराष्ट्रात पुरोगामी राज्य आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी भुकेला राहता कामा नये. हे आमचे प्रमाण आहे.

हेही वाचा~Ayushman Card : तुमच्या कडे आहे का ? आयुष्मान वय वंदना कार्ड अशी आहे प्रक्रिया

त्याचबरोबर वृद्ध पेन्शनधारकांना दीड हजार रुपये वरून 2100 रुपये देण्याचा या ठिकाणी वचन आम्ही देतोय. त्याचबरोबर बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ते देखील आम्ही त्यांचे पुनरावृत्ती या ठिकाणी करत आहोत.

हेही वाचा~ आयुष्मान भारत योजना 2024 Ayushman App व सविस्तर माहिती


महाराष्ट्र हे दहा लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य आहे. आपलं आणि त्यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला विद्यावेतन म्हणजे काय स्टायफंड पण देण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा त्यांनी केली.

आमचे सोशल मीडिया

माहितीस्तव चे whatsapp चॅनल

 माहितीस्तव चे facebook चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment