Maharashtra Rain : महाराष्ट्रात कुठे पडणारा पाऊसकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Rain
नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात अद्यापही गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 2 ) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा~ ChatGPT एका सेकंदात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारं ?
नैर्ऋत्य अरबी समुद्रात तसेच दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. गुरुवारी (ता. 2) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील राजापूर येथे 50 मिलिमीटर, कणकवली येथे 30 मिलिमीटर, लांजा आण वैभववाडी येथे 10 मिलिमीटर, मध्य महाराष्ट्रातील पंढरपूर येथे 20 मिलिमीटर, तर मराठवाड्यातील देगलूर येथे 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होत आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. पहाटे गारठा जाणवत असला तरी अद्याप गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. गुरुवारी (ता. 31) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 36.7 अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे 36 अंश, तर जळगाव, सोलापूर, सांताक्रूझ, वर्धा येथे 35 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
आज (ता. 2) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
तापमान
गुरुवारी (ता. 31) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
हेही वाचा ~ ई-पीक पाहणी | E Pik Pahani app 2024
पुणे 33.2 (20.4), अहिल्यानगर 32.9(20.5), जळगाव 35.7 (18), कोल्हापूर 31.6 (23.2), महाबळेश्वर 28.6 (17.6), मालेगाव 32.2 (20), नाशिक 33.5(19), निफाड 33.1 (18), सांगली 32.4 (22.8), सातारा31.7(21.4), सोलापूर 35.2(24.1), सांताक्रूझ35.1 (25.3), डहाणू 33.5 (24.4), रत्नागिरी 32.2 (24.3), छत्रपती संभाजीनगर 33 (20.4), बीड – (20), परभणी34.7 (23), अकोला35.9 (21.9), अमरावती 36 (22.6), भंडारा 34 (22.4), बुलडाणा 32.3 (20.4), ब्रह्मपुरी 36.7(22.9), चंद्रपूर 34.4 (20.6), गडचिरोली 32.4 (21), गोंदिया 34.6 (21.2), नागपूर 34.7(22.5), वर्धा35 (23.6), वाशीम 34.6 (-), यवतमाळ 34 (22).
विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव, लातूर.
३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी 36.7, अमरावती 36 , अकोला 35.9, जळगाव 35.7, सोलापूर 35.2 सांताक्रूझ 35.1, वर्धा 35.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.
Just grabbed the rr3gameapk. Quick install, easy to play. Not expecting much, but seems decent for a few mins of fun. Here is where i got it: rr3gameapk