श्री संत अण्णा महाराज मेंढा ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा-2024

। । संत चरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळून जाय । ।

Pandharpur श्री क्षेत्र मेंढा हे श्री संत अण्णा महाराज यांच्या पद पावन स्पर्शाने पवित्र झालेलं मेंढा हे गाव, गाव तस लहान परंतु गावाची महती दूरवर पसरली आहे. मेंढा गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. गावाला मोठी संत परंपरा लाभली आहे. मेंढा गावात संत अण्णा महाराज या संताने गावाला भक्ती मार्गावर आणले. महाराजांनी संतश्रेष्ठ श्री. गोरोबा काका तेर येथे 42 वर्ष सेवा केली . त्यायोगे या भूमीचे व परिसराचे उद्धाराचे कार्य पूर्ण केले. त्यांनी मौजे मेंढा ता. जि. धाराशिव येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे अप्रतिम मंदिर निर्माण केले व याच भूमीत देह ठेवला. त्याची समाधी स्थापना करून या वर्षी 35 वर्ष होत आले आहेत.

हेही वाचा ~ फेसबुक ॲपचे प्रमुख फीचर्स Facebook चे व्यवसाय मॉडेल आणि जाहिराती.

अखंड हरिनाम सप्ताह

मेंढा येथे महाराजाची पालखी पंढरपूर येथे जाऊन आल्या नंतर म्हणजे डिसेंबर महिन्याचे शेवटी मोठा अखंड हरिनाम सप्ताह असतो. या सप्ताह मध्ये 8 दिवस रामायण अथवा भागवत कथेचे आयोजन करण्यात येते त्यात हजारो भाविक याचा लाभ घेतात. रोज नामांकित महाराजांचे कीर्तन असते . शेवटीच्या दिवशी काल्याचे कीर्तन असते व महाप्रसादचा कार्यक्रम असतो. त्यात हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. सप्ताहाच्या दिवसात गावकरीता हर्ष उत्सहाचे वातावरण असते.

संत चरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळून जाय ।

मग रामनाम उपजे आवडी ,सुख घडोघडी वाढू लागे ।

कंठी प्रेम दाटे नयनी नीट लोटे । हृदयी प्रगटे रामनाम ।

तुका म्हणे सावध सुलभ गोगटे परी उपतिष्ठे रामनाम । ।

पालखी सोहळा (Pandharpur)

समस्त गावकरी मंडळ व सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की,प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत अण्णा महाराज याचा पालखी सोहळा श्री क्षेत्र मेंढा येथून कार्तिक शुद्ध वारीसाठी मंगळवार दि .5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 09 वा. श्री विठ्ठल मंदिरातून प्रस्थान होत आहे. तरी भाविक भक्तांनी बहुसंख्येने दिंडीत सहभागी व्हावे हि नम्र विनंती.

हेही वाचा ~ ChatGPT एका सेकंदात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारं ?

आश्या प्रकारे 15 दिवसाची पंढरपूर वारी करून श्री संत अण्णा महाराज यांची पालखी मेंढा येथे परत येते . पालखी सोबत शेकडो नागरिक पायी चालत जातात व चालत येतात. यात लहान थोर महिला पुरुष यांचा समावेश असतो. वारी सोबत सर्व प्रकारच्या सुविधा असतात. त्यामुळे भाविकांना कुठेच अडचण येत नाही. वारी आनंदात पार पडते.

जर कोणाला पायी पंढरपूर वारी करायची असेल तर आपण या वारीचा अवश्य लाभ घेऊ शकता.

pandharpu

अंनत जन्माचे विसरलो दुःख । पाहता तुझे मुझ पांडुरंगा ।

नामा म्हणे जीवे निबलोण । विटे सहित चरण वोवळिन । ।

आमचे सोशल मीडिया

माहितीस्तव चे facebook चॅनल

माहितीस्तव चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment