MSP
MSP हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. यंदा अतिवृष्टीने मुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. तरीही शेतकऱ्यांनी जिद्द न सोडता बऱ्यापैकी उत्पादन घेतले, मात्र बाजारात सोयाबीनचे दर पडलेले होते. व्यापारी ते सोयाबीन 3500 हजार ते 3800 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.
हेही वाचा – POCRA-2 महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार पोकरा 2
शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व जिल्यात तेसच धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन साठी MSP हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात 16 हमीभाव खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी सात केंद्रावर सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 4892 रुपये हमीभाव दिला जात आहे. सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर गर्दी केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अंदाजे 8000 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.
सोयाबीनच्या खरेदीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यास काल रात्रीपासून सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी माहिती आमदारनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून हमीभाव योजनेमुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, याची खात्री निर्माण झाली आहे.
हेही वाचा -Sugarcane Season 2024 : ऊसतोड महामंडळाची रक्कम भरल्याशिवाय गाळप परवाना नाही
हमीभाव खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात.
- योग्य भाव मिळतो.
- व्यापाऱ्यांच्या शोषणापासून सुटका होते.
- पिकाचे योग्य मूल्य मिळाले आणि शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान ठरते.
- शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी लागणारा पैसा उपलब्ध होतो.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.