PAN 2.0 Apply Online
PAN 2.0 : CBDT नुसार, जुने पॅन कार्ड असलेले करदाते QR कोड असलेल्या नवीन कार्डसाठी अर्ज करु शकतात.
PAN 2.0 Apply Online: पॅन 2.0 च्या माध्यमातून केंद्र सरकार आता जुन्या पॅन कार्डच्या जागी नवीन पॅन कार्ड सादर करणार आहे. असे असले तरी तुमचा जुना पॅनदेखील वैध राहील. पण, नवीन पॅन कार्डमध्ये तुम्हाला QR कोडची सुविधा मिळणार आहे. तुम्ही हे नवीन QR कोड असलेले पॅन कार्ड तुमच्या ईमेल आयडीवर विनामूल्य मिळवू शकता. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पण, तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवे असल्यास शुल्क भरावे लागेल. पण, ई-मेल आयडीवर ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस फॉलो करावी लागेल जाणून घेऊ…
हेही वाचा – APAAR Card : प्रत्येक विध्यार्थ्याला काढावे लागणार ‘अपार कार्ड ‘
ईमेलवर ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आयकर विभागाच्या FAQ नुसार, प्रत्यक्ष पॅन कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराला 50 रुपये निर्धारित शुल्क भरावे लागते. भारताबाहेर पॅन कार्ड डिलिव्हरीसाठी अर्जदाराकडून 15 रुपये + भारतीय टपाल शुल्क आकारले जाईल. PAN 2.0 प्रकल्प अद्याप सुरू व्हायचा असला तरी करदाते आणि व्यक्ती सध्या त्यांच्या ईमेल आयडीवर पॅन मिळवू शकतात. आयकर डेटाबेसमध्ये कोणताही ईमेल आयडी नोंदणीकृत नसल्यास, करदाते PAN 2.0 प्रकल्पांतर्गत इन्कम टॅक्स डेटाबेसमध्ये ईमेल आयडी टाकून विनामूल्य अपडेट करू शकतात.
NSDL वेबसाइटवरून पॅन कार्ड मिळविण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स PAN 2.0 Apply Online

- सर्वप्रथम https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या लिंकवर क्लिक करा.
- वेब पेजवर येताच पॅन, आधार (केवळ व्यक्तीसाठी), जन्मतारीख टाका.
- आवश्यक माहिती भरल्यानंतर बॉक्स टिक करा आणि सबमिटवर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन वेब पेज ओपन होईल, जिथे तुम्ही आयकर विभागाकडे दिलेली माहिती अपडेटेड आहे की नाही हे तपासा. यानंतर तुम्ही वन टाइम पासवर्ड (OTP) पर्यायावर क्लिक करा.
- OTP टाका आणि व्हेरिफाय करा. लक्षात ठेवा OTP फक्त 10 मिनिटांसाठी वैध असेल.
- पेमेंट प्रोसेससाठी तुम्हाला सोईचा वाटेल तो पर्याय निवडा. अटींशी सहमत असल्यास तुम्ही Proceed to Payment पर्याय निवडा.
- देयक रक्कम तपासा आणि ‘Pay Confirm ‘वर क्लिक करा.
- पेमेंट पूर्ण झाल्यावर, सुरू ठेवा वर क्लिक करा.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर आयकर डेटाबेसमध्ये अपडेट केलेल्या ईमेल आयडीवर पॅन वितरित केले जाईल.
PAN 2.0 Apply Online तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पॅन मिळवण्यासाठी 30 मिनिटे लागू शकतात. तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर पॅन न मिळाल्यास, तुम्ही पेमेंट तपशिलांसह tininfo@proteantech.in वर ईमेल पाठवू शकता. वैकल्पिकरित्या, करदाते त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर 020 – 27218080 किंवा 020 – 27218081 वर कॉल करू शकतात.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.