Soyabean Hamibhav Nodani :
Soyabean Hamibhav Nodani : सोयाबीन हमीभाव विक्रीच्या नोंदणीला 15 दिवसांची मुदत वाढ 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकत होते. परंतु अद्यापही सोयाबीन हमीभाव केंद्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याने पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
हेही वाचा – MSP हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे
Soyabean Hamibhav Nodani : बारदाना तुटवड्याच्या कारणानं सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष सोयाबीन खरेदीसाठी उशीर झाला. त्यात ओलाव्याचं प्रमाण अधिक असल्याने सोयाबीन खरेदीला वेग आलेला नव्हता. त्यात हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीची नोंदणी मुदत संपत आली आहे. परिणामी सरकारने यापूर्वीच नोंदणीला मुदत वाढ दिली होती. मात्र अद्यापही खरेदीला वेग न आल्याने 15 खरेदी केंद्रावर 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मार्केट फेडरेशनकडून देण्यात आली आहे.
सध्या खुल्या बाजारात 4 हजार 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. तर सोयाबीनचा हमीभाव 4 हजार 892 रुपये सरकारने जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी करून सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकार करत आहेत.
Soybean MSP Procurement
Soyabean Hamibhav Nodani : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र 2 टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ 24 हजार टनांची खरेदी पूर्ण यंदाच्या हंगामात सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली असल्याने केंद्र सरकारने सोयाबीन हमीभावाने खरेदीचा निर्णय घेतला. 15 ऑक्टोबरपासून नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी सुरू करण्यात आली. परंतु सुरुवातीला बारदाना तुटवडा आणि सोयाबीनमधील ओलाव्याच्या कारणाने सोयाबीन खरेदीला वेग आला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने सोयाबीनमधील ओलाव्याच्या निकषात बदल केले.
हेही वाचा – Soybean : सोयाबीन खरेदीला गती,
शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 कोटी रक्कम जमा
ओलाव्याचे निकष 12 टक्क्यावरून 15 टक्क्यावर नेला. परंतु या गोंधळात सोयाबीनची नोंदणीची मुदत संपली. परिणामी सरकारने 15 दिवस नोंदणीची मुदतवाढ दिली. 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकत होते. परंतु अद्यापही सोयाबीन हमीभाव केंद्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याने पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
केंद्र सरकारने ओलाव्याच्या निकष 12 वरून 15 टक्के केल्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली जात नसल्याचं शेतकरी सांगतात. हमीभाव खरेदी केंद्राला अजून सरकारकडून ओलाव्या नव्या निकषाप्रमाणे खरेदी करण्याचे आदेश मिळाले नाहीत, असं हमीभाव खरेदी केंद्र सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत आहे.
Soybean Procurement : सोयाबीन खरेदी 12 टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू
दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 13 लाख टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु अद्याप उद्दिष्टाच्या केवळ 2 टक्के सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीचा फायदा देण्यासाठी सरकारने खरेदीचा वेग वाढवणं गरजेचं आहे.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.