Sugarcane Crushing Season :
Sugarcane Crushing Season : राज्याचा ऊस गाळप हंगाम गुरुवार (ता. 15) पासून सुरू करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
राज्याचा ऊस गाळप हंगाम गुरुवार (ता.15) पासून सुरू करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे साखर आयुक्तालयाने जवळपास 100 साखर कारखान्यांना गाळप परवानेदेखील जारी केले आहेत.
हेही वाचा -Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर.
राज्याचा ऊस गाळप हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय यापूर्वी मंत्री समितीने घेतला होता. परंतु काही राजकीय नेत्यांनी त्यात खोडा घालून हंगाम 20 नोव्हेंबरनंतर सुरू करण्याचा आग्रह धरला होता.
त्यामुळे कोणत्याही कारखान्याला तूर्त गाळापाचा परवाना देऊ नये अशी भूमिका राज्य शासनाने घेतली होती. या भूमिकेला साखर संघ व ‘विस्मा’ने कडाडून विरोध केला. त्यामुळे राज्य सरकार नमले व गुरुवारी (ता. 14) अंदाजे 100 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले.
साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी गाळपाचे परवाने वाटताना एक अट टाकली आहे. ‘‘मंत्री समितीने निश्चित केल्यानुसार किंवा निवडणूक आयोगाने काही सूचना केल्यास त्यानुसार साखर कारखान्याला कामकाज करावे लागेल,’’ अशी अट परवाना देताना टाकण्यात आलेली आहे.
हेही वाचा -sugar cane : विस्मा कडून ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्याची मागणी..
दरम्यान, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘‘यंदा गाळपाला उशीर झाल्यामुळे साखर उद्योगाचे नुकसान होणार आहे. परंतु, आणखी उशीर होणार नाही याची काळजी घेतल्यामुळे आम्ही साखर आयुक्तालय व राज्य सरकारचे अभिनंदन करतो,’’ असे श्री. ठोंबरे यांनी सांगितले.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.
हेही वाचा -Sugarcane Season 2024 : ऊसतोड महामंडळाची रक्कम भरल्याशिवाय गाळप परवाना नाही